सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

वाटचाल डिजिटल शाळेकडे

एक पाऊल पुढे. ... डिजिटल शाळेकडे वाटचाल....  

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती (गंगाधरी) , तालुका - नांदगाव ( नाशिक) आपले सहर्ष स्वागत करित आहे.

         आमच्या शाळेत वाढदिवस उपक्रम राबविला जातो. त्याच धर्तीवर आज त्यात नाविन्यपूर्ण काहीतरी करावे असा विचार डोक्यात आला . बर्याच दिवसापासून पालकांकडे TAB साठी पाठपुरावा करत होतो. गेल्या काही दिवसापासुन पालकांना टॅबचे महत्त्व समजावून सांगत होतो.परंतु ठीक आहे च्या पुढे उत्तर नाही. मी स्वतः शाळेसाठी TAB खरेदी करून बरेच दिवस झाले परंतु एकच TAB किती जण वापरणार. ऋतुजा कर्नरचे पालक TAB साठी तयार असुनही दुकानापर्यंत जाईनात. 

        अखेर तो प्रसंग आलाच आज ऋतुजाचा वाढदिवस. औचित्य गाठले, लागलीच पालकांना सकाळीच दुकानात बोलावून घेतले. आणि नव्या पर्वाची सकाळ उगवली. TAB ची खरेदी झाली व ऋतुजाला वाढदिवसाची भेट भेटलीच. ऋतुजाच्या वाढदिवसाची भेट म्हणून तिच्या वडीलांनी टॅब घेऊन दिला.विद्यार्थ्यांनी ऋतुजा कर्नर या विद्यार्थ्यांनीचा वाढदिवस साजरा केला.
                
                       .

                   

                   



     आता वाटचाल झाली डिजिटल शाळेकडे....

     पालकांतही TAB ची उत्सुकता....
     परिसरात कुतूहलाचे वातावरण तयार झाले आहे..
     व आम्हालाही घ्यायचा...     नकळतच निघतात उद्गार...
     TAB वर शिकणार्या मुलांचे पालक करतात कौतुक...
     असे वाटते  ही शाबासकीची थाप आपल्यासाठीच आहे.
     धन्यवाद।।।

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!