वृक्षसंस्कार व वृक्षसंवर्धन
2017-18 वृक्षदिन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती गंगाधरी ता.नांदगाव जि.नाशिक येथे विविध कार्यक्रमांसह वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच केदाबाई इघे, ग्राम पंचायत सदस्य दिगंबर भागवत, भगीरथ जेजुरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लहानू कर्नर , बाळू ठोंबरे , भास्कर मिस्तरी, संगीता सोमासे, सीमा सोमासे , इंदुबाई कर्नर आदी उपस्थित होते. यावेळी लिंब , बेहडा, कन्हेर , आवळा आदी झाडं लावण्यात आले. सकाळी वृक्षदिंडी काढुन परिसरात वृक्षारोपणाविषयी जनजागृती करण्यात आली. निसर्गाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणिव जागृती होण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 1) चित्र रंगवा स्पर्धा - यात निसर्ग चित्र या विषयावर चित्र रंगवा स्पर्धा आयोजित करण्यात आली. 2 ) निबंध स्पर्धा- माझे आवडते झाड, झाडाचे फायदे , पावसाळ्यातील एक दिवस आदी विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आली. यास्पर्धांचे परीक्षण मुख्याध्यापिका श्रीमती आशा चिने मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन गोरख जाधव सर यांनी केले.
![]() |
![]() |
दै पुण्यनगरी दि 3/7/2017 |
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!