सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

शैक्षणिक व्हिडीओ

          प्रगत शैक्षणिक महाराष्‍ट्र अंतर्गत, शिक्षण आयुक्‍त मा. डॉ. पुरुषोत्‍तमजी भापकर साहेब यांच्‍या मिशन मोबाईल डिजीटल स्‍कुल या उपक्रमातून प्रेरणा घेत जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांसाठी, जिल्‍हा परिषदेचे शिक्षक ज्ञानरचनावाद, ई-लर्निंग,पाढे, कविता, पाठ,विद्यार्थ्‍यांचे सादरीकरण,प्रमोशनल व्हिडीओ अशा अनेक विषयावर  स्‍वत:शेकडो शैक्षणिक व्हिडीओ तयार करीत आहेत.

         मोबाईल डिजीटल स्‍कुल मध्‍ये मॅग्‍नीफाईंग ग्‍लास चा वापर करुन मोबाईलवर हे शैक्षणिक व्हिडीओ विद्यार्थ्‍याना दाखवण्‍यास अत्‍यंत उपयुक्‍त सिद्ध होत आहेत.

        महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक शाळा प्रगत व्‍हावी हा एकमेव उद्देश त्‍यामागे आहे. असे हे शेकडो शैक्षणिक व्हिडीओ आता डाउनलोड करण्‍यासाठी एकाच लिंक वर उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहेत.


          सदरील महा लिंक वर क्‍लीक करुन महाराष्‍ट्रातील शिक्षक स्‍वत: किंवा केंद्र स्‍तरावर / बीट स्‍तरावर / पंचायत समिती स्‍तरावर हे व्हिडीओज डाउनलोड करुन इतरांना वितरीत करु शकतात.

         सदरील व्हिडीओज मोबाईल वर प्‍ले होतात किंवा पेन ड्राईव्‍ह चा वापर करुन LED TV / Projector वर प्‍ले होवू शकतात. हे व्हिडीओज ज्ञानदानाचे 100% कार्य करतात.


No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!