सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

खड्यांतून संख्या शिकणे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती (गंगाधरी) , तालुका - नांदगाव ( नाशिक) आपले सहर्ष स्वागत करित आहे. धन्यवाद।।
✳  खड्यांतुन संख्या शिकणे. 

             या उपक्रमामध्ये केवळ ९ खड्यांतून मुले एक अंकी संख्या , १८ खड्यांतून दोन अंकी संख्या , २७ खड्यांतून तीन अंकी संख्या तसेच ३६ खड्यांतून चार अंकी संख्या लिहितात व वाचतात. याप्रमाणेच कृती केल्यास मुले कोटी पर्यंतच्या संख्या वाचन व लेखन करतात. 

✳ कार्यपद्धती :
एकक साठी खड़े रंग - काळा
दशक साठी खड़े रंग - पांढरा
शतक साठी खड़े रंग - पिवळा
हजार साठी खड़े रंग - हिरवा          

        यापद्धतीने खड्याना रंग देऊन घेणे. वर्गात साधारण १५ ते २०सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ रेखाटून घेणे. आता एका मुलाला ठराविक अंतरावरून केवळ काळे ९ व पांढरे ९ खड़े वर्तुळात टाकण्यास सांगावे. वर्तुळात पडलेले खड़े केवळ विचारात घ्यावेत व वर्तुळाबाहेरील खड़े बाजूला ठेऊन द्यावेत. वर्तुळात पडलेल्या खड्यांपैकी प्रथम पांढरे खड़े मोजावेत व नंतर काळे खड़े मोजावेत.       उदाहरणार्थ :     गोलात १८ खड्यांपैकी ६ काळे खड़े व ७ पांढरे खड़े पडले. यात प्रथम पांढरे खड़े मोजावेत , डायरेक्ट ७ असे न मोजता १०,२०,३०,......,७० असे मोजावेत. व नंतर काळे खड़े मोजताना मोजलेले पांढरे खड़े सत्तर आणि काळा खड़ा एक ७१ व पुढे ७२,७३,७४,७५,७६ असे मोजावेत.          यापद्धतीने ९९ पर्यन्तच्या संख्या पहिलीचे मुले १५ दिवसात तयार करु शकतात. याप्रमाणेच २७ खड़े घेऊन ९९९ पर्यंतच्या संख्या तर ३६ खड़े घेऊन ९९९९ पर्यंतच्या संख्या पहिलीचे मुले देखील तयार करतात. पुढे वेगळ्या रंगाचे खड़े वापरून हजारच्या पुढील संख्याही तयार करता येतात. 

✳ या उपक्रमातुन पुढील उद्दीष्टे साध्य होतात :
१) मुर्त वस्तु संबोधाकडुन मुले संख्या संबोधा कडे जातात.
२) गोलात खडे टाकताना मुले आनंदायी पध्दतीने संख्या शिकतात .
३) घोकम पट्टी शिवाय संख्याचे दृढीकरण होते .४) लहान वयोगटासही संख्या पटकन समजण्यास मदत होते. 
५) एकक ,दशक, शतक ,हजार हे स्थानिक संबोध समजतात.

         या उपक्रमाचा सराव घेतल्यानंतर इ .३री व ४थीच्या वर्गात मला आलेला अनुभव असा की, जी मुले संख्यावाचनात चुका करत होती , पाठीमागे होती ती मुले अतिशय आनंदाने व दडपणाशिवाय संख्या वाचन व लेखन करू लागली . अगदी  पहिलीच्या वर्गास याच पध्दतीने सराव दिल्यानंतर ती मुले देखील ३ अंकी संख्या लवकरात लवकर वाचायला लागतात. हा गणिती संख्या खेळ सर्वांना नक्कीच आवडेल.        



        धन्यवाद!!!

  संकलन व उपक्रम
     आशा चिने

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!