सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

बाल आनंद मेळावा २०१५-१६



जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती (गंगाधरी) , तालुका - नांदगाव ( नाशिक) आपले सहर्ष स्वागत करित आहे. धन्यवाद।।

                  


जि.प.प्राथमिक शाळा तळेवस्ती गंगाधरी येथे आज बाल आनंद मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन मा.सरपंच सौ.केदाबाई इघे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य श्री.दिंगबर भागवत, श्री.भगिरथ जेजुरकर, श्री. तुकाराम कर्नर, मधुकर ठोंबरे, नगरसेवका सौ अलकाताई कर्नर , आदी उपस्थित होते.  यावेळी अनिसचे प्रतिनिधी श्री भगिरथ जेजुरकर यांनी विविध प्रयोग सादर केले. व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी लावलेल्या दुकानांना भेट दिली व वस्तू खरेदी केल्या . या मेळाव्यात स्टेशनरी, स्वीट कॉर्नर, वडापाव, भाजीपाला, फळे आदी प्रकारचे दुकाने लावली होती.  या बाल आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खरेदी विक्रीचा अनुभव मिळाला.याउपक्रमाचे सर्व पालकांनी स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका आशा चिने मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन गोरख जाधव सर यांनी केले.






No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!