सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

शाळा अनुदान – विनियोग मार्गदर्शिका (माध्यमिक)

RMSA अंतर्गत शाळा अनुदान 


राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत आवर्ती अनुदानामधून प्रति वर्षी जिल्हा परिषद , मनपा,नपा,शासकीय ,अदिवासी विकासातील आश्रम शाळा व समाज कल्याण विभागातील शासकीय आश्रम शाळांना रु.50,000/- प्रति शाळा 'शाळा अनुदान' म्हणून देण्यात येतात. सदरची रक्कम 'शाळा व्यवस्थापन व विकास समितीच्या' मान्यतेने विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन खर्च करण्याबाबत वेळोवेळी परिपत्रकाद्वारे व मार्गदर्शक सभा मधून 'रामाशिअ' तर्फे कळविण्यात आलेले आहेत.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाकडील गुणवत्ता , समानतेसाठीचे विस्तारित जाणारे उपक्रम लक्षात घेता शाळा शाळा अनुदानामधून खर्च करावयाच्या मान्य बाबींची यादी खालील प्रमाणे :

शाळा अनुदानातून खर्च करावयाच्या मान्यबाबींची यादी:-
  • वर्तमान पत्रे , शैक्षणिक मासिके , व्दिमासिके , त्रैमासिके , वार्षिके इत्यादी नियतकालिके.
  • शालेय गुणवत्ता वाढीकरीता विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग उअपक्रम आयोजन .
  • विविध शैक्षणिक साहित्य.
  • शालेय पुस्तके , हस्तपुस्तिका , संदर्भ ग्रंथ.
  • विविध शब्दकोश.
  • विविध पुस्तके.
  • पुस्तक , अहवाल बांधणी.
  • शालेय व कार्यालयीन स्टेशनरी.
  • वीज बील.
  • इलेक्ट्रीकल उपकरणे.
  • फोन व इंटरनेट बील.
  • पाणीपट्टी बील.
  • फर्निचर .
  • कॅमेरा.
  • आयसीटी संदर्भातील संदर्भ पुस्तके व सॉप्ट मटेरियल.
  • संगणकाचे सुटे भाग व संगणक दुरुस्ती.
  • संगणक CD , Floppy , Software, Pen drive, इत्यादी.
  • Water Purifier , Smart Board, Edu. Projector.
  • LCD , Screen.
  • शाळा व विध्यार्थ्यांच्या स्वच्छ्तेसाठी लागणारी विविध उत्पादने.
  • खेळाचे विविध साहित्य.
  • विविध संगीत साहित्य.
  • कार्यानुभव विषयासाठी लागणारे अनुषंगिक साहित्य.
  • नृत्य , चित्रकला, व सांस्कृतीक विषयांसाठीचे साहित्य.
  • प्रयोगशाळेसाठी लागणारे साहित्य.
  • व्यवसाय मार्गदर्शन संदर्भातील साहित्य.
  • विविध स्पर्धा परिक्षांसाठीचे साहित्य.
  • अभ्यासिकेसाठी लागणारे साहित्य.
  • नकाशे, तक्ते , मॉडल्स, इत्यादी.
  • शालेय बगीच्यासाठी लागणारे साहित्य.
  • नकाशा स्टॅड .
  • पृथ्वीगोल.
  • E-Learning साठी लागणारे साहित्य.
  • व्यवसाय शिक्षण – शाळा VE अंतर्गत असल्यास लागणारे अनुषंगिक साहित्य.
  • गुणवत्ता वाढीसाठीच्या विविध उपक्रमांसाठी लागणारे नोंदणी साहित्य.
  • पत्रव्यवहार पोस्टेज
  • प्रथमोपचार पेटी
  • अग्निशामक संयंत्र.
  • काचपेटी.
  • बायोमेट्री
  • दिनदर्शिका
  • विविध माहिती दर्शक तक्ते- पेन्टींग , छ्पाई, फ्लेक्स इ.
  • रामाशिअ, लोगो - पेन्टींग
  • वचन काटा.
  • टेबलक्लॉथ , कर्टन
  • सायकल स्टॅड
  • झेरॉक्स व छ्पाई.
  • किशोरी उत्कर्ष मंच इत्यादी योजनांसाठी स्वतंत्र अनुदान न आल्यास सदर योजना
  • पुढे चालू ठेवण्यासाठी.
  • फ्लॅनल बोर्ड
  • पाणीसाठी करीता पिंप व इतर

           वरील यादीतील साहित्य शाळांनी रु. 50,000/- शाळा अनुदानातून वित्तीय नियमावलीचा वापर करून खर्च करावे. शाळा अनुदानातून खरेदी केलेल्या साहित्याची नोंद साठा ' नोंदवहीत ' ठेवावी.शाळांनी आपल्या गरजांची निश्चिती करून प्राधान्य क्रम ठरवावे. शाळा व्यवस्थापन व विकास समितीच्या मान्यतेने अनुदान खर्च करावे. अनुदान संबंधित आर्थिक वर्षाच्या मार्च महिन्या अखेर पर्यंत खर्च करावे .

 प्राथमिकसाठी शाळा अनुदान रु. ५०००/- असते , त्यानुसार खर्च करावा .

..

1 comment:

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!