सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

बाल आनंद मेळावा २०१६-१७

  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती गंगाधरी येथे बाल आनंद मेळावा संपन्न झाला.

    या मेळाव्याचे उदघाटन दिप प्रज्वलन करून करण्यात आले. या मेळाव्यात स्टेशनरी , स्वीट मार्ट, चाॅकलेट सेंटर, भेळ सेंटर, जनरल स्टोअर, चहा, वडापाव, भजी , भाजलेल्या शेंगा, केळी , भाजीपाला, डाळींब सेंटर, खेळणी, मनोरंजक खेळ आदी दुकाने  लावण्यात आली होती. 
    प्रमुख पाहुण्यांनी मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केली. विद्यार्थ्यांनी स्वतः खरेदी व विक्री केली त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला. यातुन विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडली विद्यार्थ्यांचे शिक्षण ज्ञानरचनावाद पध्दतीने आनंददायी व कृतीयुक्त व्हावे तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रत्यक्ष अनुभवातुन व्हावे यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळुन विद्यार्थ्यांचे व्यावसायिक कौशल्य वृध्दींगत होते आणि अध्ययन व अध्यापन  प्रक्रिया रंजक व सुलभ होते. तसेच श्रमप्रतिष्ठा मुल्य वृध्दींगत होते.  
    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुढील मान्यवर उपस्थित होते.  केंद्र प्रमुख श्री.टिळेकरसर,  उपसरपंच श्री. संदीप खैरनार, ग्रामपंचायत सदस्य श्री.दिगंबर भागवत, ग्रामपंचायत सदस्य श्री.भगिरथ जेजुरकर, श्री.सुनिल शिंदे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.लहानु कर्नर, उपाध्यक्ष श्री. बाळु ठोंबरे,  श्री.संजीव पवार सर आदी सह पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यास बापु कदमसर , राजेंद्र कदमसर, कन्नोरसर , निवृत्ती बागुल सर , संजय कोकणी सर ,श्रीमती गायत्री पाटील मॅडम, श्रीमती ज्योती पाटील मॅडम आदींनी भेट दिली.  
      या बाल आनंद मेळाव्याचे सूत्रसंचालन श्रीमती आशा चिने मॅडम यांनी तर आभार प्रदर्शनश्री गोरखनाथ जाधव सरांनी केले .







































बाल आनंद मेळाव्याचे स्वागताचे व खरेदीचे फोटो पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करणे 



No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!