सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

शाळा सिद्धी

🍁 *शाळा सिध्दी*🍁


अतिमहत्त्वपूर्ण व लक्षवेधी
शाळासिध्दी वेबपोर्टल चा अड्रेस बदलला आहे. 
           नवीन अड्रेस पुढीलप्रमाणे     
http://shaalasiddhi.nuepa.org                               प्रथम
1)30 मार्च 2016            
2)3 नोव्हेंबर 2016 KRA            
3) 7 जानेवारी 2017 
चे शाळासिध्दी संदर्भातील  शासननिर्णय वाचा.                             यापूर्वी बर्‍याच शाळांनी नोंदणी केली आहे. परंतु आता सर्वच शाळांना या नवीन वेब साईटवर जाऊन लॉगिन व्हायला हवे. काही शाळांमध्ये अकाउंट डिसेबल असा संदेश पहायला मिळत होता. तो आता दिसणार नाही. कारण येथे पासवर्ड बदलण्याची सोय करून दिली आहे.                     
1)http://shaalasiddhi.nuepa.org वर जा.           
2) तेथे प्रथम sse - national university of planning and..... असा result दिसेल  तो सोडून दुसर्‍या क्रमांकाचे  shaalasiddhi अशा result वर क्लिक करावे.     
3)आता स्क्रीन वर प्रथम होम व शेवटी login अशी आडवी टॅब दिसतात. तर आता login बटणावर क्लिक करा.         
4)समोर 7 रंगाची 7 क्षेत्र दिसतात. तेथे आताच काही करू नका. 
5)login वर username च्या जागी शाळेचा udise नंबर टाकून  पासवर्ड नवीन घालायचे आहे. या करिता तेथेच खाली New user वर क्लिक करा.                   
6)समोर creat user दिसेल. step 1 new user details दिसते. 
7)select user मध्ये school user निवडावे. खाली युडायस नंबर टाकावा. आता मुख्याध्यापक यांचे नाव व मोबाइल नंबर हा संगणक हाताळणारे शिक्षक किंवा शिक्षकेतर यांचा टाकावा. कारण one time password या क्रमांकावर मिळणार आहे.  आता त्याखालील generate pin(otp) वर क्लिक करा.                    8)आता step 2 create password ही टॅब दिसते. तेथे सूचनेप्रमाणे कार्यवाही करा. डाव्या बाजूला दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून तशी कार्यवाही करा.              9) आपण आता मोबाइलवर आलेला otp टाकून login झालात.                         
10)आता यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार डाव्या बाजूच्या home, manage user request ला न जाता evaluation start खाली दिलेल्या Learners, teachers, school evaluation composite matrix, मधील 7 क्षेत्रांची स्वयंमुल्यमापन स्टेपनुसार भरावे. Action for continues school improvement plan मध्ये शाब्दिक माहिती भरावी. व submit करावी. तुमचे स्वयंमुल्यमापन पूर्ण झाले.        
11) reports टॅबवर क्लिक करून सर्व reports मिळतात त्याची प्रिंट काढून घ्या.               
12)आता तुम्ही जर स्वयंमुल्यमापनात 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले असतील तर आपण बाह्यमूल्यमापनासाठी सिद्ध झालात. 

खालील स्क्रिनशॉट आपल्याला नक्की  लॉगिन साठी उपयोगी पडतील.
1)http://shaalasiddhi.nuepa.org वर जा. 

 2) तेथे प्रथम sse - national university of planning and..... असा result दिसेल  तो सोडून दुसर्‍या क्रमांकाचे  shaalasiddhi अशा result वर क्लिक करावे.   
3)आता स्क्रीन वर प्रथम होम व शेवटी login अशी आडवी टॅब दिसतात. तर आता login बटणावर क्लिक करा.    
समोर creat user दिसेल. step 1 new user details दिसते. select user मध्ये school user निवडावे. खाली युडायस नंबर टाकावा. आता मुख्याध्यापक यांचे नाव व मोबाइल नंबर हा संगणक हाताळणारे शिक्षक किंवा शिक्षकेतर यांचा टाकावा. कारण one time password या क्रमांकावर मिळणार आहे.  आता त्याखालील generate pin(otp) वर क्लिक करा.  
ह्या Instructions काळजीपूर्वक वाचा.
ज्या तुम्हाला लॉगिन साठी फायदेशीर आहेत.

CREATE USER

   Instructions
Please follow these instructions while creating the User ID and Password.
Step 1 :
1. Schools should login only through the school user.
2. Enter a valid UDISE Code (Ex: For School user eleven digit UDISE code).
3. Enter all mandatory fields.
4. To generate a Unique PIN (OTP), enter either Mobile No. /Email Id or Both.
5. After the successful PIN (OTP) generation, enter the valid PIN (OTP) that is received on your Mobile No. /Email Id to proceed further.
   Note: If you don't receive PIN(OTP) within 120 seconds, click on Regenerate PIN(OTP) button.
6. Click on Submit.
   a) If you have entered valid PIN(OTP), you will be redirected to Step 2.
   b) If the entered PIN(OTP) is invalid, you will be shown a message saying 'Invalid PIN(OTP)'.

Step 2 :
7. Enter new password and confirm password.
(Rule:Password length should be between 8 to 10 characters, must contain at least one lower case letter, one upper case letter, one digit and one special character.Allowed special chars are !@#$%^&*()+=.)(Ex: Nav@2012)
8. Click on Create User.
   a)On successfull creation of password, you will be redirected to home page.
   b)If the password entered does not confine to the Rule(Refer Point 7), a validation message will be shown.
Note- Kindly fill the information (Students and Teachers) of the previous year (2015-16) and for seven key domains select the current year (2016-2017).


नंतर आपल्याला आपला
Id व  password चा मेसेज येतो. संबंधित मोबाइल अथवा mail वर .
त्यानेच नंतर लॉगिन करावे.
व माहितीसाठी खालील pdf डाउनलोड करावा.

खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा

शाळास्तरावरील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी करावयाची कार्यवाही

1. सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016 चे काळजीपूर्वक वाचन करावे.
2. “शालासिध्दी” संदर्भातील  school Evaluation या  Dashboard ( दर्शक फलक ) वर केंद्र शासनाच्या www.nuepa.org , www.nuepa.eduplan.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करण्यात यावे.
3. शाळा माहिती व दर्शक फलक (Dashboard) नुसार आपल्या शाळेची माहिती सात मुख्य क्षेत्र व 45 उपक्षेत्रानुसार तयार करण्यात यावी.शाळेची वस्तूनिष्ठ स्वरुपाची माहिती, नाविन्यपूर्ण उपक्रम माहिती तयार करुन ठेवावी. या माहिती बरोबरच माहितीची पुष्टी देणारे पुरावे , फोटो, चित्रफिती, रजिष्टर, अभिलेखे तयार करण्यात यावे.
4. शाळा – UDISE CODE युडायस कोडचा वापर करुन शाळेचा पासवर्ड असलेला लॉग इन आय डी (Login ID) शाळा तयार करु शकते. यासाठी शाळेने LOGIN ID म्हणून शाळेचा UDISE कोड टाकावा. शाळेचे gmail खात्याचा समावेश करावा. पासवर्ड शाळेनेच निवडून तो टाकावा. त्यानंतर हाच पासवर्ड जतन करावा व प्रत्येक लॉग इन च्या वेळी वापरावा.आपल्या शाळेचे खाते अशाप्रकारे उघडून शाळा स्वयं मूल्यमापन विषयक सर्व माहिती भरावी व save करावी. (त्यासाठी अगोदर वर दिलेल्या pdf मधील माहिती जमा करावी जेणे करून माहिती भरताना काही अडचणी येणार नाहीत) काही बदल नसल्यास final submit करावी. Final submit केल्यानंतरच सदरची माहिती इतरांना दिसेल याची नोंद घ्यावी.
5. शाळेची माहिती व बाह्यमूल्यमापनाची तयारी पूर्ण झाल्यावर शाळेने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे कडे शाळा बाह्य मूल्यमापन व समृध्दशाळा प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर 1 महिण्याच्या आत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे कडून शाळा बाह्य मूल्यमापन निर्धारकांकडून करण्यात येईल. निर्धारणाच्या वेळी शालेय माहितीशी संबंधित सर्व माहिती, पुरावे व अभिलेखे निर्धारकांना उपलब्ध करुन देणे शाळांना बंधनकारक आहे.
6. बाह्य मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित शाळा ही समृध्द शाळा निकष पुर्तता करीत असल्यास नियोजित तारखांना शाळेचे प्रमाणपत्र “समृध्दशाळा – 2016” अर्थात“SS- 2016”वितरीत केले जातील.
7. शाळा सिध्दी- समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठीdir.mscert@gmail.com वshalasiddhimaha@gmail.com या मेल ॲड्रेस चा वापर करावा.
8.सर्व माहिती भरुन झाल्यावर खालील लिंक मध्ये देखील माहिती भरण्यात यावी. 
● *शाळांसाठी आचारसंहिता* – शाळा माहितीचे प्रपत्रे ऑनलाईन भरण्यासाठी सात क्षेत्रे व 45 उपक्षेत्राची माहिती तयार करुन ठेवावी.चूकीची माहिती भरली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.शाळा निर्धारणासाठी येणा-या निर्धारकांना कोणत्याही कामाची किंवा नोंदीची सक्ती करु नये.निर्धारकांना आवश्यक त्या माहितीचे रजिष्टर्स,दाखले,पुरावे व अभिलेखे पाहण्यासाठी उपलब्ध करुन द्यावे. निर्धारक, कामकाज याबाबत योग्य ती गोपनियता पाळण्यात यावी.

● *शाळा बाह्य मूल्यमापनासाठी आवश्यक निर्धारक (Assesoors) निर्मिती व कार्यपध्दती*

1.निर्धारक म्हणून काम करण्यास इच्छूक व्यक्तीने सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016 चे काळजीपूरक वाचन करावे.
2.निर्धारक निवडीसाठी तयार करण्यात आलेल्या गुगल फॉर्म मध्ये आपली माहिती भरावी. सदर लिंकनुसार प्राप्त अर्जामधून निर्धारकांची निवड केली जाईल. निवड करतांना निर्धारकाचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव व उल्लेखनीय कामाचा विचार केला जाईल.
3. गुगल फॉर्म लिंक  फक्त असेसर करिता -
4. निर्धारकांनी “ शाळा सिध्दी ”संदर्भातील  school Evaluation या Dashboard (दर्शक फलक ) वर केंद्र शासनाच्या  www.nuepa.org , www.nuepa.eduplan.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करावे.
5.निर्धारकांसाठी आयोजित प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे बंधनकारक राहील. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच शाळा बाह्य मूल्यमापन करण्यासाठी निर्धारक म्हणून कामकाज करता येईल. निर्धारकांसाठी विद्या परिषदेने नियोजित केलेल्या तारखांना संबंधित शाळांचे बाह्य मूल्यमापन करणे अनिवार्य राहील.
6. शाळा सिध्दी- समृध्दशाळा - या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठी dir.mscert@gmail.com व shalasiddhimaha@gmail.com या मेल ॲड्रेस चा वापर करावा.

*निर्धारकांसाठी आचारसंहिता*– 
1.शाळा स्वयं मूल्यमापन व शाळा बाह्य मूल्यमापन याबाबत योग्य ती गोपनियता पाळण्यात यावी.विद्या परिषदेने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

आपल्या सर्व शाळांना शाळासिध्दी यशस्वीतेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.   

संकलन
आशा चिने
धन्यवाद !



No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!