सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

जागतिक चिमणी दिन

जागतिक चिमणी दिन


      मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस – २० मार्च २०१० रोजी पाळला गेला.
     सध्या चिमण्यांची संख्या झपाट्यानं घटत आहे. प्रत्येकाच्या लहानपणीच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असेलल्या चिमण्यांचं संवर्धन व्हावं या करता, आमच्या शाळेनं उपक्रम राबवला आहे. जागतिक चिमणी दिनानिमित्त या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी चिमणी विषयावर कविता लिहिल्या आहेत.
       उन्हाळ्यात चिमण्यांसाठी खिडकीत, बागेत, शेतात पाण्यानी भरलेली भांडी ठेवण्याविषयी आव्हान केलं जात आहे, अनेकवेळा कडक उन्हाळ्यात पाणी न मिळाल्याने चिमण्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो.
मी शाळेत काढलेली रांगोळी
विद्यार्थ्यांनी बनविली कविता

निसर्गाची एक सुंदर निर्मिती  म्हणजे पक्षी.... त्यात चिमणी हा छोटासा पक्षी पण सकाळी सकाळी अंगणात चिवचिवाट करत वातावरण प्रसन्न करणारा हा पक्षी नेहमी घराजवळ राहतो.  जगातील सर्वात स्वस्त असा छंद म्हणजे पक्षी निरिक्षण..... तसेच पर्यावरण रक्षणासाठी चिमणी मदत करते ,  म्हणून चिमणी जगली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करु या.... आपल्या विद्यार्थ्यांना ही त्याचे महत्त्व समजावून देऊ. 👌

2 comments:

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!