सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

Sunday 8 July 2018

माझी बदली- तळेवस्ती to गुरेवाडी

      


#बदली निमित्ताने मनातील थोडी धगधग.
        2009 मध्ये नांदगाव मध्ये पाऊल ठेवले, शाळा तळेवस्ती येथे प्रथमच रुजू होण्यासाठी. ऑर्डर वरील शाळेचे नावही वाचताना होणारी अडचण, अन् शाळा पाहूनच आलेली निराशा भयानकच होती. कारण शाळा मेंढपाळ लोकांच्या घरात भरत होती- जिथे रात्री मेंढ्या बसायच्या अन् दिवसा आम्ही. वडील भावाप्रमाणे गोरख जाधव सरांनी सांभाळून घेत माझा शाळा प्रवास सुरु झाला. सुरुवातीचे काही वर्षे प्रशासन, परिस्थिती समजून घेताच कसे निघून गेले कळलेच नाही.
            दरम्यान 'माझी समृद्ध शाळा' उपक्रम राबवत असताना आलेल्या तुमच्या शाळेची ब्लॉग-वेबसाईट आहे का?  ह्या एका प्रश्नाच्या उत्तराखातर मिळालेली संजीवनी अविस्मरणीयच ठरली. शून्य अनुभवातून सुरू केले स्वतःचेच स्वतःशी क्लास. गुगललाच गुरू बनवलं. अन् तालुक्यातला "ज्ञानामृत"(talevasti.blogspot.in) हा प्रथम शाळेचा ब्लॉग अवतरला. या एका क्षणाने माझी ओळखच बदलली. आनंद गगनात मावेना. मग मी शाळेतील उपक्रम ब्लॉग व युट्युबद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवू लागले. 
         बाल आनंद मेळावा, स्नेहसंमेलन, महिला मेळावा, पालक भेट, वृक्षारोपण, संगीतमय परिपाठ, ज्ञानरचनावाद, व्हिडीओ निर्मिती,आनंददायी अध्ययन-अध्यापन सारखे विविध उपक्रम राबविता-राबविता शाळा उपक्रमशील झाली. शाळेला संगणक, टीव्ही, टॅब मिळाला अन् शाळा डिजिटल झाली.
          प्रत्येक शाळेत महिला शिक्षिका हवीच आणि मी शाळेतील प्रथम महिला शिक्षिका म्हणून मुले माझ्याभोवती रेंगाळू लागले जसं आई अन् लेकरू. शाळा ही माझं कुटुंबच बनली. माता भगिनीं(मैत्रिणी)मुळे उपक्रम फुलून जायचे. पालकांना आम्हां शिक्षकांचं खूप कौतुक असायचं. अजूनही आहे. पण बदलीच्या वाऱ्याने पालकांचं मन दुखावलं गेलं.
         कार्यालयाची सोपस्कर आटोपून तळेवस्ती शाळेत बदलीनंतर आज प्रथम पाऊल ठेवलं. सर्वजण माझी वाटच पाहत होते. मी येताच सर्वांनी हातातील कामे सोडून धावत पळतच शाळेकडे धाव घेतली. काही विद्यार्थी अगोदरच व्हरांड्यात येऊन बसलेले होते. पालकही वार्ता कळताच हजर. सर्वजण फक्त डोळ्यांतूनच बोलत होते. पालकांनी माझ्या निरोपाचा कार्यक्रम ठेवला. एका अनामिक दुःखाचा आवंढा गिळत निरोपाची रेलचेल शाळेत सुरू झाली. सर्व महिलांनी शाळेत जेवणाची तयारी केली पण प्रथमच मला सोडून.आपल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकानेच माझ्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. हे सर्व बघून मन सतत भरून यायचं. कसं सावरायचं स्वतःला अन् या सर्वांना. तुम्ही जाऊ नका ना! हे वाक्य ऐकताना आभाळ फटल्यागत व्हायचं. सर्वांच्याच नयनी आसवांचे पूर. भरलेले डोळे खूप काही बोलत होते. अन् माझी अवस्था? मी काय सोडून आले? याची तिळमात्र कल्पनाही कोणी करू शकत नाही. मी माझं सर्वस्वच तळेवस्तीला सोडून आले.
          खरंच ! किती हे प्रेम! आपल्या लोकांपेक्षा जास्तच माया यांनी लावली, जणू सर्वस्वच झाले. सर्वांनी माझा जो सन्मान केला माझ्यासाठी तो सर्वोच्च पुरस्कारच म्हणेन. त्यांच्या या रुणाची उतराई होणं कठीणच. मी पालकांच्या परीक्षेत खरी उतरल्याचं समाधान मला मिळालं. मी भाग्यवान आहे की मी शिक्षक आहे. आणि माझा अट्टाहास हाच होता की जे मला नाही मिळालं ते सर्व या बालकांना मिळावं आणि त्यांनी सुसंस्कृत व्हावं. सर्वच उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण अन् निकोप असावं.आणि हो, तशीच संस्कारक्षम पिढी ह्या शाळेत शिक्षण घेत आहे. तळेवस्तीचा शाळा हा प्रवास नेहमीच अविस्मरणीय राहील, कारण आमचे ऋणानुबंध तेवढे घट्ट होते.
        बदली माझ्या गावाकडं झाली पण कुठे आहे तो आनंद? नांदगाव तालुक्याने मला खूप काही दिले- शिकण्याची संधी अन् संधीचे सोने करण्यासाठी सुंदरशी परिस्थिती. माझ्या पोखरी केंद्रात मला खूप प्रेमळ माणसं मिळाली. गोरख जाधव सरांनी शाळा प्रवासात माझी खूप चांगली सोबत केली. कदाचित तशी सोबत पुन्हा होणे नाही.विस्तार अधिकारी ठोके मॅडम यांचे मी विशेष धन्यवाद मानेन, कारण त्यांनी मला सदैव शाबासकी देऊन खूप मोठं बनवलं. सर्वांचेच विशेष आभार. अशीच साथ सदैव असू द्या.

आशा चिने
शाळा गुरेवाडी,ता. सिन्नर (नवीन शाळा)


जि प प्राथ. शाळा तळेवस्ती गंगाधरी, ता नांदगांव (नाशिक)- प्रथम शाळा

Sunday 8 April 2018

शिक्षणाची वारी,नांदगाव -२०१८


पंचायत समिती शिक्षण विभाग - नांदगाव,
आयोजित
शिक्षणाची वारी
दि- ३१/3/२०१८ ,

सादरकर्ते 

जि. प. प्राथ. शाळा तळेवस्ती गंगाधरी, केंद्र-पोखरी, 

ता.नांदगाव, जि.नाशिक.

शिक्षकवृंद 

श्रीमती आशा चिने
श्री गोरख जाधव सर
@सहभागी विदयार्थीनी@
नितल, ईश्वरी, तनुजा,प्रतिभा



याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या
सभापती सौ.सुमनताई निकम ,
उपसभापती सुभाषनाना कुटे,
जिल्हा परिषद सदस्या अश्विनीताई आहेर ,
पंचायत समिती सदस्या विद्याताई पाटील,
पोखरीचे उपसरपंच संभाजी शिंदे ,
गटविकास अधिकारी जे.टी.सूर्यवंशी साहेब,
गटशिक्षणाधिकारी पावसे साहेब ,
शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती नंदा ठोके madam ,
शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री.विष्णू निकम सर,
व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालक 
केंद्रप्रमुख शीला घुगे madam ,
ठकाजी नाईकवाडे सर,
शांताराम गवळे सर,
बाळासाहेब खैरनार सर ,
संजीव पवार सर,
सुभाष चव्हाण सर,
सुदाम सूर्यवंशी सर,
मुख्याध्यापक ,
शिक्षकवृंद व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.  
केंद्रप्रमुख
शीला घुगे madam ,
ठकाजी नाईकवाडे सर,
शांताराम गवळे सर,
बाळासाहेब खैरनार सर ,
संजीव पवार सर,
सुभाष चव्हाण सर,
सुदाम सूर्यवंशी सर,
मुख्याध्यापक ,
शिक्षकवृंद
यांनी शिक्षणाची वारी यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले .

शिक्षणाची वारी फ्लिपबुक 






































व्हिडिओ पहा,.... 
तालुकास्तरीय वारी -नांदगाव 

 
केंद्रस्तरीय वारी -पोखरी केंद्र 


वारी शाळा तळेवस्ती 

  


शिक्षणाच्या वारी निमित्ताने भेट दिलेल्या सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक आभार.....
तसेच मार्गदर्शक अधिकारी वर्ग, दालन उभारणीसाठी, वारी यशस्वी करण्यासाठी  मेहनत घेतलेल्या पोखरी केंद्राचे केंद्रप्रमुख पवार सर व केंद्रातील समस्त शिक्षकवृंदांचे मनापासून आभार.... 

view pdf

वारीचे फोटो
 श्री गोरख जाधव सर...शाळा तळेवस्ती
EDITING AND PUBLISHING 
श्रीमती आशा चिने ,तळेवस्ती

वारी आवडल्यास प्रतिक्रिया जरूर लिहा...धन्यवाद...




Wednesday 21 March 2018

जागतिक चिमणी दिवस

Image by Asha Chine






२० मार्च हा दिवस दरवर्षी "जागतिक चिमणी" दिवस म्हणून पाळला जातो.

चिमण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे तरी आपण पर्यावरण वाचवुया आणि चिमण्या वाढवुया...

             या उपक्रमासाठी गोरख जाधव सरांनी चिऊताई साठी दाणा-पाण्याची व्यवस्था केली...विद्यार्थ्यांना आमची शाळा तळेवस्ती येथे प्रात्यक्षिके करून दाखविली...

चिमणी माहिती 
    चिमणी भारतात सर्वात जास्त संख्येने आढळला जाणारा पक्षी आहे. चिमण्या सतत आवाज करत असतात ज्याला चिवचिवाट म्हणतात.नराला चिमणा म्हणतात. तो थोडा गडद रंगाचा असतो आणि कपाळावर आणि शेपटीजवळ राखाडी रंग असतो, कानाजवळ पांढरा भाग आणि कंठापासून छातीपर्यंत मोठा काळा ठिपका असतो.मादी चिमणी थोडी तपकिरी रंगांची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या रेषा असतात. चिमण्याची चोच काळी असते तर चिमणीची तपकिरी रंगाची असते.चिमण्या चार ते सहा इंच लांबीच्या असतात आणि वजनाने खूप हलक्या म्हणजे २५ ते ४० ग्राम असतात.चिमण्या माणसांच्या वस्तीजवळ रहातात आणि भारतात जवळपास सर्वत्र आढळतात तसेच ब्रिटन मध्येही मोठ्या प्रमाणवर आढळतात. चिमण्या जंगलात किंवा वाळवंटात राहत नाहीत. चिमण्या एकत्र कळपाने रहातात.चिमण्या खरे तर मांसाहारी आहेत पण त्यांनी काळानुरूप खाद्य सवयीत बदल केले. चिमणीचा प्रमुख चारा किडे, कीटक, धान्य तसेच शिजवलेले अन्न आहे.चिमणीच्या उडण्याचा सरासरी वेग ताशी २४ मैल आहे परंतु संकट भासल्यास ताशी ३१ मैल वेगाने सुद्धा उडू शकतात. चिमण्या जलीय पक्षी नसल्या तरीसुद्धा शिकाऱ्या पासून वाचण्यासाठी वेगाने पोहू सुद्धा शकतात.चिमणी घरटे बांधण्यासाठी गवत, काटक्या, कापूस, पिसे अश्या वस्तू वापरते. त्यांचे घरटे सहसा झाडावर, अडचणीच्या जागी, इमारतींच्या कोपऱ्यामध्ये असते.अंडी देण्याचा ठराविक हंगाम नसतो. चिमणी एका वेळी चार पाच अंडी देते. अंडी हलक्या हिरव्या रंगाची असतात व त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात.अंडी उबविण्यापासून पिल्लांचे पालन पोषण करण्यापर्यंत सर्व कामे चिमणा चिमणी दोघे मिळून करतात. अंडी उबविण्यासाठी जवळपास अकरा दिवस लागतात आणि दोन आठवड्यात पिल्लू मोठे होऊन घरटे सोडून उडून जाते.चिमण्या आक्रमक नसल्या तरीही त्यांच्या घरट्याचे संरक्षण मात्र आक्रमक पद्धतीने करतात.कुत्रा, मांजर, कोल्हा, साप हे चिमण्यांचे नैसर्गिक शत्रू आहेत.चिमणीचे आयुष्यमान तीन वर्षापर्यंत असते.वाढते शहरीकरण, घरटे बांधायला जागेचा अभाव, अन्नाची कमतरता या कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.चिमण्यांची दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या प्रमाणाबाबत जागरूकता आणण्यासाठी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो. १८८३ मध्ये चिमण्यांना मारणे हा गुन्हा होता आणि त्यांची हत्या थांबविण्यासाठी कायदा सुद्धा अस्तित्वात होता.
संकलित माहिती....

 पक्षी निरीक्षण - छंद माझा आगळा
पहा व्हिडीओ.....

आशा चिने....




Monday 19 February 2018

जनजागृती गीताने पर्यावरणाचा जागर

पर्यावरणाचा जागर असाही
शाळा तळेवस्ती
राष्ट्रीय लोक अदालत कार्यक्रम
तालुका विधी सेवा समिती आयोजीत


मा.न्यायाधीश- प्रेरणा दांडेकर मॅडम (अध्यक्षा)
मा.तहसीलदार-योगेश जमदाडे साहेब
मा.गटविकास अधिकारी-जे.टी. सूर्यवंशी साहेब
वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र दराडे
ग्रामविकास विभागाचे विस्तार अधिकारी
वकील संघाचे प्रतिनिधी,
ग्रामसेवक संघटनेचे प्रतिनिधी,
पत्रकार, तलाठी,विधी सहाय्यक, शिक्षकवृंद,
समस्त ग्रामपंचायत गंगाधरी, जळगाव खु। व कळमदरी -सरपंच, ग्रामसेवक, सदस्य व ग्रामस्थ ता.नांदगाव

यांच्या उपस्थितीत शाळा तळेवस्तीने विविध ठिकाणी जाऊन पर्यावरणाचा जागर केला...
आपल्या जनजागृती गीतातून त्या-त्या गावात जाऊन प्रत्यक्ष पर्यावरणाचा जागर केला, आपल्या गीतातून विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी लोकांना
झाडे लावा- झाडे जगवा।
पाणी आडवा- पाणी जिरवा।
हा संदेश दिला.
विदयार्थ्यांनाही एक व्यासपीठ मिळाले.
करिता आम्ही तालुका विधी सेवा समितीचे आभारी आहोत.
शिक्षकवर्ग
श्रीमती आशा चिने मॅडम
श्री गोरख जाधव सर







बघा व्हिडिओ




बघा व्हिडिओ



watch video


धन्यवाद...

Thursday 1 February 2018

डिजिटल शाळा उद्घाटन



बॅनर

निमंत्रण पत्रिका

👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खुशखबर! खुशखबर! खुशखबर!
🌷🌷🌷🌷🎈🎈🎈🎈
शाळा तळेवस्ती व दत्तवाडीच्या 
संयुक्त शिक्षण परिषद च्या निमित्ताने
📱📲💽📧📂📎🖇📀

आमच्याकडे

🖥⌨🖱📺🖥⌨🖱📺

डिजिटल शाळा उद्घाटन सोहळा
विद्यार्थ्यांसाठी
सुरुची भोजनालय अनावरण


🍛🍛🍛🍛🍛🍛🍛
कार्यक्रम संपन्न झाला.
💐💐💐💐💐💐💐💐
      दि. ०१/०२/२०१८ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती गंगाधरी ता.नांदगाव जि.नाशिक येथे डिजिटल शाळा उदघाटन सोहळा संपन्न 

    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती गंगाधरी ता.नांदगाव जि.नाशिक ही शाळा ग्रामपंचायत गंगाधरी  व तळेवस्ती गंगाधरी येथील पालक यांच्या मदतीने शाळा डिजिटल झाली आहे. तळेवस्ती येथील पालकांनी डिजिटल शाळेसाठी भरीव अर्थिक मदत केली.  ग्राम पंचायतने शाळाला 32 इंची टी व्ही. दिला तर तळेवस्ती गंगाधरी येथील पालकांनी लोकसहभागातुन संगणक घेण्यासाठी व डिजिटल शाळेसाठी भरीव अर्थिक मदत केली.  यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल पध्दतीने अध्यापन तर होणारच आहे. तसेच संगणकाचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. 
       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार श्री. मारुती जगधने,  पत्रकार संजीव धामणे , पत्रकार संजीव निकम,  पत्रकार संदिप जेजुरकर , शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती ठोके मॅडम, माजी केंद्र प्रमुख  टिळकर सर,  सरपंच संदिप खैरनार, ग्राम पंचायत सदस्य दिगंबर भागवत, भगीरथ जेजुरकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची पाहणी करून शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डिजिटल शाळेचे उदघाटन करण्यात आले. 
         तसेच विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या सुरुची भोजन कक्षाचे उदघाटनही यावेळी करण्यात आले यावेळी ग्राम पंचायत गंगाधरी व तळेवस्ती येथील पालकांच्या वतीने  तळेवस्ती शाळेच्या उपक्रमशील शिक्षक श्रीमती आशा चिने मॅडम व गोरख जाधव सर यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार मारुती जगधने यांनी तर जंगलात असलेली शाळा मंगल कार्य करत असल्याचे गौरव उदगार काढले. तर पत्रकार संजीव धामणे यांनी ही शाळा शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात असून ही उत्कृष्ट काम करत असल्याच्या  भावना व्यक्त केल्या . 

पत्रकार संजीव निकम यांनी तळेवस्तीचे शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर कल्पकतेने करत असल्याचे  विचार व्यक्त केले. तसेच  प्रत्येक शिक्षक  लक्षपूर्वक काम करत असल्याचे विचार प्रमुख मान्यवरांनी  शाळा पहाणी नंतर मांडले. शाळेला संगणक घेण्यासाठी मदत केलेल्या पालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला  अशा दानशूर पालकामुळे शाळेचा विकास होईल असे मत मान्यवरांनी मांडले.  
        यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लहानू कर्नर, विष्णूपंत शिंदे , गंगाधर कर्नर, मारुती शिंदे ,   पोखरी केंद्राचे केंद्र प्रमुख संजीव पवार  सर , व शिक्षक भरतीचे जिल्हा अध्यक्ष प्रकल्प पाटील , शिक्षक बापू आहिरे,  राजेंद्र कदम , रमेश आहिरे , प्रवीण पाटील , गोविंद मंडळ , बापु कदम , राजेश्वर ठोंबरे, विनायक बोरसे , बाळासाहेब पाटील,  शिक्षिका हर्षा बिसंदरे, भाग्यश्री गोसावी , वृषाली पाटील , अधिपरिचारीका मिना जाधव,  सविता परदेशी  पोखरी केंद्रातील शिक्षक तसेच पालक  सुकदेव कर्नर, सिताराम कर्नर, बाळू सोमासे,  मच्छिंद्र वाघमोडे, मिननाथ शिंदे, लक्ष्मण आयनर ,  कैलास शिंदे, अंगणवाडी सेविका स्मिता जाधव व छाया गांगुर्डे , चिमा मोटे , हिंमत शिंदे, दिगंबर शिंदे आदीसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
      पालक मधुकर ठोंबरे यांनी शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले व शिक्षकांच्या आदर्श कामाचा गौरव केला. 
        स्वागत श्रीमती आशा चिने मॅडम यांनी केले तर प्रास्तविक गोरख जाधव यांनी केले तर सुत्रसंचालन राकेश पगार यांनी केले. यावेळी पत्रकार संजीव धामणे यांनी शाळेला रुपये 1000 ची मदत जाहीर केली.  
        हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक निवृत्ती बागुल सर, चंद्रकांत शिंदे सर , संजय कोकणी सर , विनोद मेश्राम सर , धर्मराज पाटील सर,  पालक भास्कर ठोंबरे, बाळू ठोंबरे, शिवाजी कर्नर, मधुकर ठोंबरे,  शिवाजी शिंदे, साहेबराव कमोदकर , मनिषा ठोंबरे , कविता भागवत,  संगीता सोमासे , त्र्यंबक जाधव , पांडुरंग आहेर,  भास्कर मिस्तरी , सोमनाथ कोरडकर , दशरथ कोरडकर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  
        आभार प्रदर्शन ज्योती पाटील मॅडम यांनी मानले.












































🎙आयोजक
शा.व्य.समिती व शिक्षकवृंद
श्रीमती आशा चिने मॅडम
श्री गोरख जाधव सर
जि प प्राथ शाळा तळेवस्ती गंगाधरी, केंद्र-पोखरी,
ता.नांदगाव, जि. नाशिक

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈