सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

पालक भेट

     आमच्या शाळेतील एक विद्यार्थ्यांनी कु. गीता समाधान कोळेकर मागील काही दिवसापासुन शाळेत येत नव्हती. सदर विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या बरोबर वाड्यावर ( मेंढ्या चारण्यासाठी चार पाच महिने ते इकडे येतात.) पहुर ता.जामनेर जि. जळगाव येथे आलेली होती. पालकांना वारंवार फोन ही केला. परंतु पालक अडचणी सांगुन आज पाठवितो, उद्या पाठवितो असेच सांगत होते.पण आज निश्चय करून आमच्या शाळेतील शिक्षक श्री गोरखनाथ जाधव सर हे सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसने पाचोरा जि.जळगाव येथे आले.तेथून पी जी रेल्वेने पहुर गाठले , पालकांना समजावले व सदर विद्यार्थ्यांनीस घेऊन नांदगाव कडे येण्यास रवाना झाले. जो घरी राहील त्याला घरी राहू द्यायचे. व घरी जाऊन त्याला दररोज घेऊन यावे.
      अशा प्रकारे सध्या हा उपक्रम आमच्या शाळेत राबविला जात आहे व त्याच्या यशस्वीतेचे हे उदाहरण . 
       धन्यवाद।।         
(2015-16)

                                                






तसेच

(2016-17)

🍀 *पालक भेट उपक्रम* 🍀
  
     *आमच्या शाळेतील विद्यार्थिनी कु गीता कोळेकर ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी वाड्यावर( धनगर लोकांचे मेंढ्या घेऊन जाण्याचे ठिकाण ) निघून गेली.पालकांना वारंवार संपर्क करूनही पालकांनी, (नातेवाईकांनी) ह्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेतले नाही.*
    *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व ऑनलाइन च्या नियोजनात अडसर बनलेली ही बाब सतत मानसिक त्रास देत होती.*
  *आज रविवार शेवटी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी श्री गोरख जाधव सरांनी गीताला तिच्या वाडा असणाऱ्या सोमठाण(मध्ये साधारणतः ३ते४ किमी, जंगल प्रदेश), ता-येवला या जंगल असणाऱ्या नदीनाल्यांच्या  भागातून आपल्या सोबत आणलं.*
     *सरांनी हा उपक्रम यशस्वी केला त्याबद्दल शाळा व मी सरांची खूप आभारी आहे.*
    *आपल्या सर्वांकडूनही त्यांना कौतुकाची थाप मिळायला हवी।*

मी आमच्या शाळेची वाहवा करत नाही , तर प्रत्येकाच्या शाळेत अशी मुले असतातच , 
      👆🏻 ही सर्वांचीच परिस्थिती (सारखीच)  असते.

     धन्यवाद।।।
*शाळा तळेवस्ती गंगाधरी(नांदगाव)*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


याचप्रमाणे याच वर्षातील ही दुसरी परिस्थिती
2016-17
📌📚📚📚📚📚📚
*पालक भेट उपक्रम*

दि 18/3/2017
वार-रविवार

आज *तळेवस्तीचे उपक्रमशील शिक्षक श्री गोरखनाथ जाधव सर पहूर, ता. जामनेर, जि. जळगाव* येथे गेले होते....
आमच्या शाळेतील तिसरीची विद्यार्थिनी *गीता कोळेकर* ही आपल्या (मेंढपाळ) पालकांसोबत शाळा सोडून न येण्यासाठीच निघून गेली होती. (साधारण ऑगस्ट ते मार्च)  पालकांनीही न पाठविण्याचे सांगून टाकले होते.  गीता हजेरीवर सतत गैरहजर दिसू लागली. तिच्या पालकांना, शेजाऱ्यांना , नातेवाईकांना सतत फोन केले, प्रत्यक्ष भेटही घेतली . पण, काही उपयोग नाही झाला. 
 100% उपस्थिती असेल तरच 100% गुणवत्ता मिळते.
   त्यात भर आणखी प्रगतची......
   तिचा हा दरवर्षीचा व नित्याचाच कार्यक्रम....
   विद्यार्थ्यांना प्रगत मध्ये प्रगत करता करता शिक्षकांची परीक्षाच चाललेली आहे......
   तिची आता पाटी पुन्हा कोरी झाली असेल....
   कसे करणार 25 निकष पूर्ण....
   
पण अशा गैरहजर विद्यार्थ्यांना सर नेहमी घरी आणायला जातात. 
       आणि आजही सरांनी गीताला नेहमीप्रमाणे आणलेच..
       खूप दिवसांनी उद्या गीता शाळेत दिसेल...
      वेगळेच वातावरण उद्या शाळेत पाहायला मिळेल...
      कदाचित तो दिवसच असेल 100% उपस्थितीचा ....
असो..... गीता आली
             याचे सर्व श्रेय सरांनाच...
             धन्यवाद सरांचे....
💐💐💐💐






शाळेत आल्यावर तिसरीची ही विद्यार्थिनी अंक १ ते १० ज्ञानरचनावादाने शिकत आहे.
आता हिची प्रगत PSM (जलद )संकलित चाचणी कशी घ्यावी..  काही सवलत ?


  शिक्षक विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनत घेतात .
 मुल शाळेत आलं पाहिजे , टिकलं पाहिजे, व शिकलं पाहिजे. 
यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतात . 
तरीही काही कारणांमुळे परिस्थिती तीच राहते.
आता ह्याच विद्यार्थिनीचे बघा ना ...
कशी टिकवायची गुणवत्ता ?
उपस्थिती ?

आणि 
कसे राबवायचे शासनाचे विविध उपक्रम ?

या सर्वांचा विचार शासन दरबारी कधी होणार ?
ही परिस्थिती बदलण्यासाठी शासन काय करू शकते ?

कृपया चर्चा करावी . कारण थोडी बहुत परिस्थिती सगळीकडे अशीच आहे.

याबात आपले मत काय ? 

 श्रीमती आशा चिने
*शाळा - तळेवस्ती*

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!