सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...
Showing posts with label प्रगत शाळा लिंक. Show all posts
Showing posts with label प्रगत शाळा लिंक. Show all posts

Sunday, 22 January 2017

प्रगत शाळेची माहिती भरा


http://goo.gl/forms/Lb27YO7Vln 

      सदरील लिंक चा उपयोग आपणास प्रगत शाळेची माहिती भरण्यास राहील.

http://goo.gl/forms/8ApgAVNyzG 
     
      या लिंक चा उपयोग आपणांस प्रगत शाळांना भेटी दिल्यानंतर पडताळणीचा अहवाल सादर करण्यासाठी होईल.


गोविंद नांदेडे, संचालक,MSCERT


📕 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित करण्यासाठी आवश्यक २५ निकष* 📕

*खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.*
  *प्रगत शाळा निकष आणि गुण*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

१) *पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)*

२) *शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)*

३) *शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)*

४) *प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान* 
*१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)*

५) *कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली व २ री साठी दोन अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)*

६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)*

७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)*

८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)*

९) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)*

१०) *वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर  उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)*

११) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)*

१२) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)*

१३) *वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)*

१४) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)*

१५) *कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)*

१६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)*

१७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)*

१८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)*

१९) *मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)*

२०) *प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)*

२१) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)*

२२) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)*

२३) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)*

२४) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)*

२५) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)*
                       *सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ४० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.*