सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

Sunday 22 January 2017

प्रगत शाळेची माहिती भरा


http://goo.gl/forms/Lb27YO7Vln 

      सदरील लिंक चा उपयोग आपणास प्रगत शाळेची माहिती भरण्यास राहील.

http://goo.gl/forms/8ApgAVNyzG 
     
      या लिंक चा उपयोग आपणांस प्रगत शाळांना भेटी दिल्यानंतर पडताळणीचा अहवाल सादर करण्यासाठी होईल.


गोविंद नांदेडे, संचालक,MSCERT


📕 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित करण्यासाठी आवश्यक २५ निकष* 📕

*खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.*
  *प्रगत शाळा निकष आणि गुण*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

१) *पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)*

२) *शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)*

३) *शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)*

४) *प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान* 
*१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)*

५) *कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली व २ री साठी दोन अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)*

६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)*

७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)*

८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)*

९) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)*

१०) *वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर  उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)*

११) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)*

१२) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)*

१३) *वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)*

१४) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)*

१५) *कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)*

१६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)*

१७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)*

१८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)*

१९) *मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)*

२०) *प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)*

२१) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)*

२२) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)*

२३) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)*

२४) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)*

२५) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)*
                       *सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ४० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.*



*शाळा सिद्धी आॅनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया*

🌞 प्रिय शिक्षक बंधू भगिनी 🙏
*शाळा सिद्धी आॅनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया*

🔵 इंटरनेट सुरु करा.
🔵 Google Chrome ओपन करा.
🔵 Address बार मध्ये *"14.139.60.151/sse/login.php"* टाईप करुन Enter  दाबा.
🔵 NPSSE ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये Login च्या box मध्ये *"Create New Account"* या पर्यायावर क्लिक करा.
🔵 Add User ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये *"User Name / UDISE"* च्या पुढे आपल्या शाळेचा UDISE कोड टाईप करा.
🔵 त्याखाली असलेल्या *"Password"* च्या समोर आपल्या आठवणीत राहील असा पासवर्ड टाईप करा. *लक्षात ठेवा : प्रत्येक लॉगीनच्या वेळी हा पासवर्ड आपल्याला टाकावा लागणार असल्यामुळे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे.*
🔵 त्याखाली *"E-mail"* च्या समोर आपल्या शाळेचा ई-मेल आय डी टाईप करा. शाळेचा ई-मेल आय डी तयार नसेल तर तो Gmail. Com वर जाऊन तयार करुन घ्या. किंवा आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
🔵 त्याखाली *"Role Type"* या पर्यायासमोर *"School User"* हा पर्याय निवडा.
🔵 वरिल सर्व बाबी बरोबर नमुद केल्याची खात्री झाल्यावर सर्वात खाली असलेल्या *"Submit"* या पर्यायावर क्लिक करा.

✨ *आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी झालेली आहे.* ✨

🔷 आता आपल्या शाळेचा *"DASHBOARD"* बघूया.
🔹डेस्कटॉपवर वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या *"LOGIN"* या पर्यायावर क्लिक करा.
🔹LOGIN विंडो दिसेल. त्यामध्ये *"USER TYPE"* च्या समोर *"School User"* हा पर्याय निवडा.
🔹त्याखाली आपल्या शाळेचा *"UDISE Code"* टाईप करा.
🔹पासवर्ड टाकून *"Submit"* या पर्यायावर क्लिक करा.
*आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसू लागेल.*

✨ *शाळेची Basic Information भरणे.* ✨

🔵 आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसल्यावर त्याच्या डाव्या बाजूला *"Basic information"* दिसते. त्यामध्ये *Learner's* या पर्यायाखाली :
1) Demographic Profile
2) Attendance Rate
3) Performance in key subjects
4) Learning Outcomes
*Teachers* या पर्यायाखाली
1) Numbers of Teachers
2) Teacher's Attendance

*वरील प्रत्येक पर्यायासमोर क्लिक केल्यावर त्यामध्ये भरावयाच्या माहीतीची विंडो ओपन होते. ती सर्व माहिती भरुन झाल्यावर खात्री करुन Submit पर्यायावर क्लिक करायला विसरु नका.*

 *7 क्षेत्र व 45 मानकांची माहीती भरुन स्वमूल्यमापन अहवाल भरणे.* ✨
 बंधू भगिनींनो!  Learners व Teachers ची माहीती भरल्यावर त्याच विंडोमध्ये आपल्याला *"7 KEY DOMAINS AS CRITICAL PERFORMANCE AREAS OF SCHOOL* च्या खाली सर्व 7 क्षेत्र दिसतील.
*शाळा सिद्धी मध्ये आपण चर्चा करीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील मानकांची चांगल्या पद्धतीने उपलब्धता वाटल्यास तशी नोंद स्वयं - मूल्यमापन अहवालात करावी. उगाच खोट्या नोंदी करु नये.*
स्वयं मूल्यमापन करतांना प्रत्येक क्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे. ते कसे करावे या साठी आपण प्रत्यक्ष चर्चेत भाग घेणे आवश्यक आहे.

*बंधू भगिनींनो! आजच आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी करून आपल्या परिसरातील शाळांसाठी आपली शाळा आदर्श बनवूया.* सर्वांना उज्ज्वल भविष्याच्या हार्दीक शुभेच्छा! 🙏💐

: *अतिशय महत्त्वाचे : Learners आणि Teachers याची माहिती भरतांना ती 2015-16 व 2016-17 या दोन्ही सत्रांची भरावी.*