सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

दाखला(L.C.) व जनरल रजि.नमुना बदल updates

▶@जनरल रजिस्टर(नमुना नं.1)@ ◀शासन निर्णय दि.१९/०९/२०१६ नुसार दाखला(L.C.) व जनरल रजि.  नमुना बदल शासन निर्णयाची अमलबजावणी संपुर्ण गटात, जिल्ह्यात व  राज्यात एकसुत्रता यावी यासाठी काही नियोजन ...
१)आपले नवीन नमुन्यानुसार दाखला पुस्तक छपाई करुन तयार ठेवणे .
२)या दाखला पुस्तकास आपल्याकडील शिल्लक दाखला पुस्तकापुढील अनुक्रमांक देणे उदा.माझ्याकडे सद्ध्या पुस्तक क्र १८ सुरु आहे पण पुस्तक क्र २० पर्यंत छापुन शिल्लक आहे तर नवीन पुस्तक क्र २१ असेल व नवीन पुस्तकाचे नंबरीग २००१ पासुन सुरु होईल .
जुने शिल्लक दाखले २०१५ पुर्वीच्या विद्यार्थ्याना शिल्लक संपेपर्यंत वापरता येतील त्यानंतर नवीन पुस्तकातील दाखला वापरु शकतो .
२)सद्ध्या वापरात असलेले जनरल रजिस्टर आपण बंद करुन १७-१८ पासुन सुधारीत नमुन्यातील रजिस्टर सुरु करणार आहोत त्यासाठी आपल्या सद्ध्याच्या जनरल रजिस्टरच्या शेवटच्या नोंदीखाली खालीलप्रमाणे शेरा मारावा लागेल .
समजा माझ्याकडील जनरल रजिस्टर पुस्तक क्रमांक ५ असुन शेवटचा दाखला नोंद क्र १३४० आहे . यानुसार शेरा 
"" शासन निर्णय १९/०९/२०१६ सुधारीत दाखला आदेशानुसार या रजिस्टरमधील शेवटची नोंद क्र १३४० असुन याठीकाणी हे रजिस्टर नोंदीसाठी बंद करण्यात येत आहे . यापुढील नोंदी नवीन नमुन्यानुसार जनरल रजिस्टर क्र ६ मध्ये करण्यात येतील . ""
यापद्धतीने कामकाज केल्यास सर्वत्र समानता येईल.
३) आपल्या विद्यालयातील सद्ध्या शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्टुडंट आय डी व आधार रेकॉर्ड उपलब्ध ठेवा ... आत्ता दहावी निकाला नंतर दाखल्यात हि नोंद  द्यायची आहे ... सरलचा स्टुडंट आय डी उपलब्ध नसल्यास सरल स्टुडंट मधे कॅटलॉग मधुन तो उपलब्ध करुन घ्या .
४)आज दाखले देतांना ज्या नोंदी आपल्या जनरल रजिस्टर मध्ये नाहीत परंतु दाखल्यावर लिहावयाच्या आहेत अशा नोंदी म्हणजे स्टुडंट आय डी ,आधार  
क्र व मातृभाषा या बाबी आपल्या जनरल रजिस्टर मध्ये आजच नोंदवून घ्या ,त्यामुळे दाखला तयार करतांना सुकरता येईल ,या तिन्ही बाबी आधीच्या दाखल्यावर नव्हत्या म्हणून नोंद का करायची असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो ,या बाबी सर्व सत्य आहेत ,त्यात बदल अशक्य आहे ,
जनरल  रजिस्टर  मधील फक्त नाव,जात,व जन्मतारीख या बाबी सक्षम मान्यतेशीवाय  बदलवता येऊ शकत नाही ,हे लक्षात घ्या. 
५)ज्याचे जन्म स्थळ भारतातील आहे त्याचे प्रत्येकाचे राष्ट्रीयत्व भारतीय आहे ... मातृभाषेसाठी गरज पडल्यास स्वयंघोषणापत्र घेतले तरी चालेल. 
६)नवीन रजिस्टरच्या प्रारंभी नेहमीप्रमाणे 
"या रजिस्टरमध्ये  पान न.... ते ..... पान न ...... अशी एकुण .... पृष्टे आहेत ...जनरल  रजिस्टर क्र .... पासुन नोंदी या मध्ये नोंदवण्यात येतील."
असे प्रमाणित करावे .
७)जुने दाखला पुस्तक योग्य वेळी वापरण्याचे स्मरण ठेवावे.दुबार दाखला व अद्याप दाखला न काढलेले २०१५ पुर्वीचे विद्यार्थ्यांसाठी शिल्लक दाखला पुस्तक संपेपर्यंतच त्याचा वापर करायचा आहे .ही बाब आपल्या सर्वांना माहित आहेच ,तरीही शै. सत्राच्या सुरवातीला आठवण करण्याचा प्रयत्न.!!

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!