सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

Wednesday 21 March 2018

जागतिक चिमणी दिवस

Image by Asha Chine






२० मार्च हा दिवस दरवर्षी "जागतिक चिमणी" दिवस म्हणून पाळला जातो.

चिमण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे तरी आपण पर्यावरण वाचवुया आणि चिमण्या वाढवुया...

             या उपक्रमासाठी गोरख जाधव सरांनी चिऊताई साठी दाणा-पाण्याची व्यवस्था केली...विद्यार्थ्यांना आमची शाळा तळेवस्ती येथे प्रात्यक्षिके करून दाखविली...

चिमणी माहिती 
    चिमणी भारतात सर्वात जास्त संख्येने आढळला जाणारा पक्षी आहे. चिमण्या सतत आवाज करत असतात ज्याला चिवचिवाट म्हणतात.नराला चिमणा म्हणतात. तो थोडा गडद रंगाचा असतो आणि कपाळावर आणि शेपटीजवळ राखाडी रंग असतो, कानाजवळ पांढरा भाग आणि कंठापासून छातीपर्यंत मोठा काळा ठिपका असतो.मादी चिमणी थोडी तपकिरी रंगांची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या रेषा असतात. चिमण्याची चोच काळी असते तर चिमणीची तपकिरी रंगाची असते.चिमण्या चार ते सहा इंच लांबीच्या असतात आणि वजनाने खूप हलक्या म्हणजे २५ ते ४० ग्राम असतात.चिमण्या माणसांच्या वस्तीजवळ रहातात आणि भारतात जवळपास सर्वत्र आढळतात तसेच ब्रिटन मध्येही मोठ्या प्रमाणवर आढळतात. चिमण्या जंगलात किंवा वाळवंटात राहत नाहीत. चिमण्या एकत्र कळपाने रहातात.चिमण्या खरे तर मांसाहारी आहेत पण त्यांनी काळानुरूप खाद्य सवयीत बदल केले. चिमणीचा प्रमुख चारा किडे, कीटक, धान्य तसेच शिजवलेले अन्न आहे.चिमणीच्या उडण्याचा सरासरी वेग ताशी २४ मैल आहे परंतु संकट भासल्यास ताशी ३१ मैल वेगाने सुद्धा उडू शकतात. चिमण्या जलीय पक्षी नसल्या तरीसुद्धा शिकाऱ्या पासून वाचण्यासाठी वेगाने पोहू सुद्धा शकतात.चिमणी घरटे बांधण्यासाठी गवत, काटक्या, कापूस, पिसे अश्या वस्तू वापरते. त्यांचे घरटे सहसा झाडावर, अडचणीच्या जागी, इमारतींच्या कोपऱ्यामध्ये असते.अंडी देण्याचा ठराविक हंगाम नसतो. चिमणी एका वेळी चार पाच अंडी देते. अंडी हलक्या हिरव्या रंगाची असतात व त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात.अंडी उबविण्यापासून पिल्लांचे पालन पोषण करण्यापर्यंत सर्व कामे चिमणा चिमणी दोघे मिळून करतात. अंडी उबविण्यासाठी जवळपास अकरा दिवस लागतात आणि दोन आठवड्यात पिल्लू मोठे होऊन घरटे सोडून उडून जाते.चिमण्या आक्रमक नसल्या तरीही त्यांच्या घरट्याचे संरक्षण मात्र आक्रमक पद्धतीने करतात.कुत्रा, मांजर, कोल्हा, साप हे चिमण्यांचे नैसर्गिक शत्रू आहेत.चिमणीचे आयुष्यमान तीन वर्षापर्यंत असते.वाढते शहरीकरण, घरटे बांधायला जागेचा अभाव, अन्नाची कमतरता या कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.चिमण्यांची दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या प्रमाणाबाबत जागरूकता आणण्यासाठी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो. १८८३ मध्ये चिमण्यांना मारणे हा गुन्हा होता आणि त्यांची हत्या थांबविण्यासाठी कायदा सुद्धा अस्तित्वात होता.
संकलित माहिती....

 पक्षी निरीक्षण - छंद माझा आगळा
पहा व्हिडीओ.....

आशा चिने....