आषाढी एकादशी म्हटले की विद्यार्थी घरीच थांबणार हे नक्की होते .
पण मी विचार केला की उद्या काहीतरी नवे करूया . जेणेकरून विद्यार्थी आवडीने (मनाने) शाळेत आले पाहिजे.
म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते .
मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले .
आणि
आषाढी एकादशी निमित्त शाळेत वारी अनुभव देण्यासाठी
चला वारीला जाऊया
उपक्रम मी शाळेत आयोजित करण्याचे ठरविले.
"वारी शाळा ते महादेवाचे मंदिर"
असा मार्ग ठरविला
"वारी शाळा ते महादेवाचे मंदिर"
असा मार्ग ठरविला
आषाढी एकादशी निमित्त मीही काही नवीन गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला.
आणि विद्यार्थ्यांना सांगून टाकले की, उद्या आपण पायी दिंडी (वारी) काढूया . काहीतरी नवीन होणार यासाठी तरी आता विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार होते (इथेच माझा उपक्रम मला यशस्वी होतोना दिसला). सर्वांनी स्वखुशीने वारी कशी काढायची ? याविषयी चर्चा करायला सुरुवात केली .मी त्यांना काही पूर्वतयारी विषयी सांगितले,आणि शाळा सुटली. विद्यार्थी वारीच्या विचारातच ... सकाळीही लवकर आले....सांगितल्याप्रमाणे तयारी करूनच ... शाळेत नसणारेही .. मोठे..छोटे...हजर होते..
पण.... शाळेत जातानाच माझा अपघात झाला ....(तशी मीही त्याच आनंदात..उत्साहात होते)...
उपक्रमावर विरजण पडताना मला स्पष्ट दिसत होते.. आणि त्यापलीकडे ... चिमुकले .. जे माझीच वाट पाहत होते...
खूप वाईट वाटत होते.. डोक्यात विचार चक्र सुरु झाले... शाळेत जाणं अशक्य होते.. माझ्या वेदना मला जाणवत होत्या .. पण त्याच्याही पलीकडचे मला दिसत होते ...
अपघात प्रसंगी मला उपस्थितांनी माझ्या सहकार्यांनी मदत केली ... डॉक्टरी इलाज उरकवले... घरी येऊन धीर केला... तशीच शाळेकडे निघाले ... होईल ते पाहू...
( इच्छाशक्तीला तोड नसते )
वेगळेच बळ मिळाले ... आणि उपक्रमाची तयारी पुन्हा सुरु झाली ...
आणि वारी निघाली ...
माझ्यासाठीही हा एक वेगळाच अनुभव होता ...
कारण आता हा उपक्रम नसून आव्हान झाले होते ...
कसा वाटला उपक्रम ...
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा ...
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!