सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

Sunday, 10 December 2017

अध्यक्ष चषक स्पर्धा २०१७-१८

जि प अध्यक्ष चषक स्पर्धा, नाशिक - 2017-18, 
शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग घेऊन यश संपादन केले.ही आनंदाची बातमी आहे.

बीटस्तर 
ठिकाण टाकळी बु . ता.नांदगाव 
समूह नृत्य प्रथम क्रमांक 
जनजागृती गीत 




पहा व्हिडिओ 
समूह नृत्य प्रथम क्रमांक 
जनजागृती गीत


     शाळा तळेवस्तीच्या तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले   पाणी व जल संदर्भात जनजागृती गीत, बीट स्तर प्रथम क्रमांक, मी ह्या नृत्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे, हे माझे आतापर्यंतचे अविस्मरणीय असे नृत्य आहे. कारण यात कस पणाला लागला होता. तालुका स्तरासाठी निवड झालेली आहे. ह्या गीतासाठी मला श्री गोरख जाधव सरांनी तांत्रिक व मोलाचे सहकार्य केले आहे .बघूया लोकांना संकल्पना किती आवडते ते..हे गीत बघून जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आणि शिक्षकही कुठेही कमी नाहीत ,हे सर्वांना दिसेल.बघणाऱ्यांना तर हे गीत आवडलेय - आपल्यालाही आवडल्यास नक्कीच share करा. हे गीत काळाची गरज आहे.- झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा, पाणी जिरवा..ही धरा सुजलाम् सुफलाम् होऊ द्या...!!!

 पोखरी केंद्र
अध्यक्ष चषक स्पर्धा केंद्रस्तर प्रथम 




यश तळेवस्तीच्या विद्यार्थ्यांचे

काही क्षणचित्रे 


केंद्र स्तर -पोखरी 
प्रथम क्रमांक कु.प्रतिभा कोळपे ३ री 
विषय - स्वच्छ शाळा सुंदर शाळा 



द्वितीय क्रमांक कु.प्रतिभा कोळपे ३ री 
विषय - स्वच्छ शाळा सुंदर शाळा 


उज्वला कर्नर २ री द्वितीय क्रमांक


समूहगीत गायन  हे शिवसुंदर समरशालिनी द्वितीय क्रमांक 


समुहनृत्य क्षणचित्रे 




मार्गदर्शक शिक्षक
श्रीमती आशा चिने मॅडम
(नृत्य दिग्दर्शन व फोटो-व्हिडीओ एडिटिंग)
श्री गोरखनाथ जाधव सर
(📸🎥 फोटोग्राफी व व्हिडीओ शुटिंग)

प्रेरणास्थान
मा.श्रीमती ठोके मॅडम
 ( विस्तार अधिकारी शिक्षण)
ता. नांदगाव

माझे youtube चॅनेल
 (शैक्षणिक व्हिडीओ)

वृत्तांकन-
श्रीमती आशा ज्ञानदेव चिने
प्राथमिक शिक्षिका
जि.प.प्राथ.शाळा तळेवस्ती(गंगाधरी), ता. नांदगाव ,नाशिक

धन्यवाद


Thursday, 7 September 2017

तळेवस्ती गणेशोत्सव २०१७-१८

शाळेत मी बनविलेली शाडू मातीची गणरायाची मूर्ती
सहकार्य व फोटोग्राफी श्री गोरख जाधव सर  



















सदर उपक्रम फक्त विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी , मनोरंजनासाठी , शालेय वातावरण निर्मिती तसेच उपस्थिती व गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविला आहे.
अशा उपक्रमांतून नकळत संस्कृतीची ओळखही होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे निरागस चेहऱ्यांवर निखळ आनंद बघण्यासाठी असे उपक्रम नक्कीच राबवावे .

Thursday, 31 August 2017

महाअवयव दान जनजागृती अभियान


☘💐☘💐☘💐☘
*माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖
' महाअवयव दान दिन '  जनजागृती अभियान

जि. प.प्रा.शा तळेवस्ती
〰〰〰〰〰〰〰
 दि. २९-०८-२०१७ रोजी आमच्या जि. प.प्रा.शाळा तळेवस्ती येथे २९ आँगस्ट हा दिवस 'महाअवयव दान दिन '
 म्हणून साजरा करण्यात आला. या अंतर्गत  प्रतिज्ञा घेण्यात आली.व  सदरील प्रतिज्ञेचे वाचन श्री गोरख जाधव सरांनी केले. अवयवाचे दान का करावे या संदर्भात  शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी कसे राहील हे ही सांगितले व  निदान  उपचाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जनजागृती आरोग्य शिक्षणाचा माध्यमातून विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य कसे राहील स्वच्छतेचे महत्त्व, अवयव दानाचे महत्त्व  ह्या संदर्भात  माहिती सांगण्यात आली. रांगोळी व निबंध स्पर्धा आयोजन मी केले.
👇👇👇👇
काही क्षणचिञे
〰〰〰〰〰〰


























✍वृत्तांकन लेखन
श्रीमती आशा चिने
जि. प.प्रा .शा.तळेवस्ती गंगाधरी
 ता.नांदगाव, नाशिक
➖➖➖➖➖➖